न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- पाकिस्तानने आजतागायत जसे कर्म केले तसेच फळ अज मिळाले. दहशतवाद्यांना वठणीवर आणण्यासाठी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व जवानांचे कौतुक आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैनिकांना लढ्यासाठी मोकळीक दिली ते लढ्यासाठी टाकलेले पहिले पाऊल होते. आज पिओके पिओकेमध्ये हल्ला करून हा पाकिस्तानला व जगाला एक इशाराच दिला.
एक प्रकारे अप्रत्यक्षपणे जागतिक शक्तीप्रदर्शनच म्हणावे लागेल. शेजारील राष्ट्र देखील आपल्या खोड्या काढताना दहा वेळा विचार करेल. राष्ट्रहितासाठी सर्व पक्षाचे नेते एकत्र आले. हे एक कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात देखील नेत्यांनी अशीच एकी दाखवावी, असे सीए संचेती सांगितले.











