न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- लग्नाला नकार दिल्याने त्याचा राग मनात धरला. आरोपीने फिर्यादी महिलेचा फोनवरुन तसेच प्रत्यक्ष पाठलाग करीत वारंवार अश्लिल शिवीगाळ केली. ” तु माझ्याशी लग्न केले नाहीस तर, मी तुझे फोटो इडीट करून व्हायरल करून तुझी बदनामी करीन व तुझे लग्न कसे होत, ते बघतो ”, अशी धमकी दिली.
माझ्याशी संबंध ठेव नाही तर मी तुला बदनाम करुन टाकीन. तु माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझे लग्न होवु देणार नाही, तसेच तु माझ्याशी लग्न केल नाहीस तर, मी आत्महत्या करील व तुला देखील मारुन टाकील, अशी धमकी देत विनयभंग केला आहे. हा प्रकार मे २०२२ ते आजपर्यंत फ्लाट नं. ५०७, ड्रिमस्केप होम्स, विकासनगर, किवळे येथे घडला.
२३ वर्षीय महीला फिर्यादी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी स्वप्नील कल्याण आंधळे (रा. माधवनगर, सांगली. वय व पत्ता पुर्ण माहीत नाही.) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहे.