न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- फेसबुकवर फिर्यादी व आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. पिडीतेला वेळोवेळी सुखवानी सिल्वर ओक फ्लॅटवर नेले. जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने फिर्यादीसोबत शारिरिक संबध प्रस्थापित केले.
फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी २०१९ ते आज पर्यंत पिंपरी येथे घडला. पिडीत फिर्यादी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मनोज रमेश शिरभाते (वय ४५, रा. सुखवानी सिल्वर ओक, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
















