न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश केला. घरातील मास्टर बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉक चावीने उघडले.
आतमधील लॉकर चावीने उघडून त्यातील १,२५,००० रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, काळया मन्यामध्ये त्याला मध्यभागी दोन पॅडल त्याचे वजन २५ ग्रॅम हे घरफोडी चोरी करून चोरून नेले आहे. हा प्रकार (दि. ८) रोजी ९.०० वा ते (दि. ९) रोजी सहा वा चे दरम्यान तनिष्क ऑर्चिड सोसायटी, बि.नं. एफ १, फ्लॅट नं. ७०२, चोविसावाडी, च-होली येथे घडला.
फिर्यादी अशिष प्रकाश वैदय (वय ३४ वर्षे, रा. तनिष्क ऑर्चिड सोसायटी, बि. नं. एफ-१, फ्लॅट नं. ७०२, चोविसावाडी, च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















