न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- तब्बल १२ लाखांची फिर्यादी यांची फॉर्च्यूनर गाडी (एमएच १२ केआर ९२९२) ड्रायव्हरने घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरी करुन नेली आहे.
ही घटना (दि. ९/१०/२०२२) रोजी रात्री ११:४५ वा ते (दि. १०/११/२०२२) रोजी सकाळी ८:४० वा चे सुमारास घडली. फिर्यादी अमोलकुमार दिलीप जैन (वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नं. अतिरा ९/२०३, सिध्द शिलाईला काटेवस्ती, पुनावळे) यांनी रावेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















