- न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल दिन व पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे राजन नायर सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राजन नायर यांनी पंडित नेहरूंबद्दल माहिती सांगून त्यांना मुलांबद्दल कसा जिव्हाळा होता. बालदिन याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार यांनी, पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. १९४२ च्या चले जाव लढ्यातही ते आघाडीवर होते. त्यांना अनेक वेळा तुरुंगावास भोगाव लागला. पंडितजींना मुले खूप आवडत म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे मत मांडले.
पंडित नेहरू यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व काव्यवाचन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा व डान्स स्पर्धा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. युथ गेम कौन्सिल महाराष्ट्र तर्फे कबड्डी स्पर्धा पिंपळे सौदागर मध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड मनपा ‘ड’ प्रभागाच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छता सर्वेक्षण बाबत पथनाट्य सादर करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवश्री नदीं आणि आभार प्रदर्शन केतकी पाटील यांनी केले.