- एकाच दिवशी मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या दोन घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या दैनंदिन घटनेत वाढत होत आहे. रविवारी (दि. १३) रोजी चिखली आणि मोशी परिसरात मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्याप्रकरणी चिखली आणि एमआयडीसी भोसरी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना राहत्या घरापासुन फिर्यादी, त्यांचा भाऊ व भाची हे ट्रॅव्हल्स पॉईन्ट, मोशी टोल नाक्याकडे पायी जात होते. मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसम पाठीमागुन आले. फिर्यादीच्या गळयातील ७५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी मंगळसुत्र (वजन अंदाजे अडीच तोळे) जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेले आहे. हा प्रकार (दि. १३) रोजी ९.३० वा. सुमारास न्यु चंदन मेडीकल समोर, मोशी टोल नाक्याजवळ, मोशी येथे घडला. फिर्यादी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दुसरी घटना राहत्या घरातून जेवण करून बाहेर फिर्यादी व त्यांचे पती वॉकिंग करीत होते. त्यांच्या पाठीमागून काळया रंगाच्या दुचाकीवरून दोन इसम आले. त्यातील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळयातील १ तोळयाचे ३५००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्ती खेचुन पळून नेले. ही घटना (दि. १३)रोजी रात्री ९.२५ वा.चे. सुमारास एस. के. मोटर्स समोर, ऐश्वर्यम हमाराजवळ, चिखली येथे घडली. फिर्यादी उषा रामसुरत यादव (वय ४० वर्ष, रा.ए/ १०४, रिव्हर रेसिडेन्सी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोटर सायकलवरील दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.