न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- बँक अकाउंटला (नंबर ०१८५१००००२५९८५) कनेक्ट असलेले क्रेडिट कार्ड हे फिर्यादी जवळ होते. अज्ञात इसमाने फिर्यादीच्या क्रेडीट कार्ड (५५२३८५४३००१६७५६३) या क्रमांकावरून ६०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करीत फिर्यादीची फसवणुक केली.
ही घटना (दि. ८/१/२०२२) रोजी ५.३६ वा. चे सुमारास के.एस.बी.चौक, निगडी येथे घडला. फिर्यादी असीम शशांक गांधी (वय ३९ वर्षे, रा. से.नं.२७, जे प्लॉट नं ३१, प्रधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















