न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
मात्र, या कारवाईवर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते विनोद कुमार उर्फ पंडित सिंह यांनी शंका उपस्थित केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून, असे काही घडलेच नसल्याचे विनोद कुमार म्हणाले आहेत.
‘पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून भाजप नेते खोटारडे आहेत. हल्ला होणार हे १० दिवसांपासून माहीत होते. १० दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये हातमिळवणी झाली होती आणि एखाद्या पडक्या घरात एक-दोन बाँब टाकण्याचा निर्णय झाला होता असा आरोप कुमार यांनी केला आहे’. मंगळवारी (दि. २७) रोजी उत्तर प्रदेशच्या गोंदा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील विधान केलं.










