न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- ” तुला मस्ती आली आहे; तु माझी पत्नी तुझ्याकडे ठेवून घेतेस ” असे म्हणून जावयाने सासूला शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेचा हात पकडून फिर्यादीचे डोके भिंतीवर आपटले. फिर्यादीने नेसलेली साडी ओढून काढून फेकली व फिर्यादीस विवस्त्र करू लागला.
तेव्हा फिर्यादीचा नातू व नात यांनी जोरात आरडाओरडा केला. ” तुला आता एक वेळ सोडतो नंतर बघून घेतो ” अशी धमकी देवून आरोपी तेथून पळून जाऊ लागला. जाताना फिर्यादीच्या मुलाला हाताने लाथाबुक्यानी मारहाण केली.
ही घटना (दि. १३) रोजी ७.३० वा. सुमारास अजिक्यतारा हौ. सोसा. ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली. ४७ वर्षीय फिर्यादी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी बळीराम व्यंकटी दराडे (वय ३०, रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















