पिं. चिं. अॅड बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीला दिल्या शुभेच्छा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- टाटा मोटर्सचे कामगार नेते आणि आ. महेश लांडगे यांचे बंधू पै. सचिनभैय्या लांडगे यांनी मंगळवारी (दि. १५) रोजी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाला भेट दिली.
वकीलांच्या बार रूममध्ये उपस्थित राहून पिंपरी चिंचवड अॅड बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नदी स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या River Cyclothon या उपक्रमात सहभागी होण्याचे उपस्थित वकिलांना निमंत्रण दिले, अशी माहिती अॅड. जयश्री कुटे यांनी दिली.
यावेळी जेष्ठ वकील अॅड. गोरडे, अॅड. लांडगे, पिंपरी चिंचवड अॅड बार असोसिएशनच्या नूतन उपाध्यक्षा अॅड. जयश्री विलास कुटे आणि वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.