न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एक वरिष्ठ निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व १८ कर्मचारी यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे तर वाकड ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव व देहूरोड ठाण्याचे सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांची बावधन वाहतूक विभागात बदली केली.
तसेच वाकड ठाण्यातील सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, बाबाजान इनामदार, हवालदार दीपक साबळे, स्वप्नील खेतले, वंदू गिरी, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, कांतेय खराडे, अजय फल्ले, तात्यासाहेब शिंदे, भास्कर भारती यांची तर देहूरोड ठाण्यातील सामील प्रकाश, सुनील यादव, सचिन सेजल, स्वप्नील साबळे, सुनील पवार या १८ जणांचीही बावधन वाहतूक विभागात बदली करण्यात आली.
















