- लसीकरण आणि आरोग्य केंद्र उभारण्याची यादव यांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- मुंबई शहरामध्ये गोवर या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कुदळवाडीमध्ये मोठी कामगार वसाहत आहे. तसेच लोकसंख्या देखील जास्त आहे. या भागामधून ट्रान्सपोर्ट संबंधित वाहनांची मुंबई शहरामध्ये ये-जा चालू असते.
मुंबई शहरातमधून या भागात येणा-या नागरिकांकडून गोवर या आजाराचा प्रसार भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कुदळवाडी येथे रिगल रेसीडेन्सी जवळ महापालिकेच्या मोकळया जागेत गोवर आजारासंबंधातील लसीकरण सुरु करावे तसेच आरोग्य केंद्र सुरु करावे, अशी मागणी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
















