न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- गल्लीतील मुले फिर्यादीच्या मुलीला वारंवार त्रास देत होते. आरोपीने फिर्यादीच्या मुलीशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. इतर दोघांनी पीडीत मुलीला जाता येता पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला.
याबाबत फिर्यादीचे पती आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. २१) सकाळी गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडला.
पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आदेश वाघमारे (वय १८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.