न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग म्हणजे डांगे चौक. या चौकात शहरातील तसेच पुणे शहरातील नागरिकांचे कामानिम्मित तसेच हिंजवडी येथे आयटी पार्क परिसरात ये-जा करण्यासाठी नागरिकांचे लोंढे येत असतात.
त्यामुळे या परिसरात कायमच वाहतुकीचे तीन तेरा वाजत असतात. याचा अभ्यास करीत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामासाठी १७ कोटी ९६ लाख ९४ हजार रुपये खर्च येणार आहे. या ग्रेडसेपरेटरची निविदा गुरुवार (दि. २८) रोजी स्थायी समितीच्या सभेसमोर मान्यतेसाठी आली होती.
टी. ॲन्ड टी इन्फ्रा या कंपनीने बांधकाम खर्च १६ कोटी ५४ लाख १० हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस, डिझाईन चार्जेस, रॉयल्टी चार्जेस यासह कंत्राटदाराने १७ कोटी ९६ लाख ९४ हजार दर निश्चित केला. या खर्चाला मान्यता देण्याचा देण्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयत्यावेळचा प्रस्ताव अखरेच्या म्हणजेच २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. त्यास मान्यता देण्यात आली.











