न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- झायसोल इंटीग्रेटेड सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीच्या डायरेक्टरने कंपनीची फ्रेंन्चाईझी, ऑफिसचे भाडे, डिपॉझिट, इंटेरिअर, कंपनीचे हब विकत घेण्यासाठी लागणारी रक्कम तसेच हबचे इंटेरिअल व इतर बाबीसांठी फिर्यादीकडून वेळोवेळी रक्कम घेतली. फिर्यादी यांना स्टोअर चालु झाल्यावर खुप प्रॉफिट होईल, असे आमिष दाखवले. मोठमोठी आश्वासने दिली. मात्र, आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात केला.
फिर्यादीची एकुण १,०७,४४,६०० रुपयांची आर्थिक फसवणुक केली. फिर्यादी यांनी पैसे मागण्यासाठी फोन केला असता त्यांना शिवीगाळी केली. पैसे घेण्यासाठी हैद्राबाद येथे आला तर जीवे मारुन टाकण्याची व तुझा एकही रुपया देणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून आजपर्यंत फिर्यादीच्या घरी, ऑफिसमध्ये व इतर हॉटेलमध्ये घडला.
फिर्यादी संतोष सुरेश काकडे (वय- ३९ वर्षे, रा. सर्व्हे नं.- ७५५/१, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे., ऑफिस पत्ता- ऑफिस नं. २०१. लाईफ व्हिला बिल्डिंग, पी.के. चौकाजवळ, नवीन बी.आर.टी रोड, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी याकुव अली खाजा अहमद, राघवेंद्र रेड्डी नानायाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.