न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- थेरगाव येथील डांगे चौक उड्डाणपुलाच्या खाली पीडीसीसी बँकेच्या समोर रस्त्याच्या कडेला, महाराष्ट्र रिक्षा पंचायत शेजारी असलेल्या हातगाडीवर व डांगे चौक उड्डाणपुलाच्या खाली एमएसइबी डीपीच्या बाजुला पांढऱ्या रंगाच्या टाटा येस गाडीतील टपरीमध्ये वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला विक्रीकरीता साठवल्याची माहिती पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना मिळाली.
पोलिसांनी (दि. ३) रोजी दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोबाईल, २ पांढऱ्या पोत्यांमध्ये आणि आणखी एका पोत्यात २९३३.५० रुपये किंमतीचा असा एकुण ५७,९१४ रुपये किंमतीचा गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला जप्त केला. हा माल आकुर्डीतील हुसेफा खान आणि वाकडचा प्रदिप गुप्ता नावाचा फेरीवाला आरोपींना आणुन देत असल्याचे त्यांनी तपासात सांगितले.
आरोपी इरफान ताहीर तांबोळी (वय ३२ वर्षे, रा. घर क्र ०५, पंचवटी कॉलनी, नगर, काळेवाडी फाटा, मुळ गाव मौजे सावरगाव, ता भुम जि उस्मानाबाद), सादिक गफुर तांबोळी (वय २७ वर्षे, धंदा रा. गल्ली क्र ६ सुदर्शन कॉलनी, वाकडरोड, वाकड, मुळ रा. मोजे उमापुर, ता. गेवराई जि बीड), हुसेफा खान (संपुर्ण नाव व पत्ता माहिती नाही), प्रदिप गुप्ता (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वाकड पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.