न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- राज्य परिवहन महामंडळातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त दर्शन सेवा ही विशेष एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी क्षमतेनुसार वल्लभनगर आगारातून रविवारपासून बस धावणार आहेत, असे आगारातून सांगण्यात आले.
श्री दत्त जयंती येत्या बुधवारी (दि. ७) साजरी होत आहे. त्यानिमित्त भाविकांनी श्री दत्तक्षेत्री जाता यावे व दर्शन घेता यावे यासाठी ही खास सुविधा असणार आहे. त्यात नारायणपूर, गाणगापूर, गोंदवले, पंढरपूर या मार्गावरील एसटी बसचा समावेश आहे.
प्रवाशांच्या संखेनुसार त्या-त्या मार्गावर एसटी बस सोडण्यात येणार आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत ही एसटीची सेवा असणार आहे. नारायणपूरलाही बुधवारी सकाळी जादा एसटी बसची सुविधा असणार आहे. भाविकांनी या सेवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.