न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- डांगे चौक येथे लॉक व पार्क करून ठेवलेली १,२५,००० रु. किं.ची रिक्षा (एमएच १४ एम १४९४) अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. ही घटना (दि. २) रात्री ८.०० वा ते ९.०० चा सुमा. सोना बियर बारच्या समोर घडली.
फिर्यादी विठ्ठल मारूती वाडकर (वय ५० वर्षे, शेडगे हाईट्स, फ्लॅट नं २०१, ए, वाकड) यांनी अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
















