न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- दुचाकी चालकाने जाणूनबुजुन दोन वेळा फिर्यादीच्या इरटीका (एमएच १४ टीवाय ६२५१) कारला धडक दिली. फिर्यादीने कार बाजुला घेतली. त्या दरम्यान दुचाकीवरील आरोपी तिघे फिर्यादीजवळ आले. ‘ तु आमच्या गाडीला डॅश का देतो ‘ असे म्हणत फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
सह आरोपींनी देखील फिर्यादीला मारहाण केली. त्यापैकी एकाने रोडच्या कडेला पडलेला ब्लॉक उचलुन ‘ तुच का पाटील, आम्ही तुला का मारतोय, तुला समझले असेन ‘ असे बोलत फिर्यादीच्या डाव्या डोळयाच्या बाजुला व डोक्याच्या पाठीमागे मारत गंभीर जखमी केले. ही घटना फिर्यादी कारने घरी जात असताना ऑस्टीन बिल्डरच्या ऑफिससमोर, ताथवडे सर्विस रोड, ताथवडे येथे (दि. ५) रोजी सायं पाच वाजता घडली.
फिर्यादी विष्णु यशवंत पाटील (वय ४५ वर्षे, रा. स.नं. ७/१ व ७/२, सनव्हीव सोसायटी, फ्लॅट नं.४०५, विंग ए/२, बँक ऑफ महाराष्ट्र पाठीमागे, सिंहगड कॉलेज रोड, आंबेगांव बु, पुणे) यांनी आरोपी अज्ञात ६ ते ७ इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















