- पिडीतेवर अत्याचार आणि बलात्कार; आरोपी अद्याप मोकाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- पीडित तरुणीशी ओळख करून तिला लॉजवर नेत लग्नाचे अमिष दाखवले. तिच्या इच्छेविरुध्द वारंवार शारीरीक संबंध ठेऊन बलात्कार केला. त्यातुन फिर्यादीला गरोदर केले व लग्नास नकार दिला. तसेच पोटातील बाळ खाली कर, नाही तर मी तुझ्याशी लग्न करु शकणार नाही, असे म्हणत पीडित फिर्यादीला जबरदस्तीने रुग्णालयात नेऊन गर्भपात केला.
त्यानंतर फिर्यादीचे दुसरीकडे लग्न जमले असता तीला धमकावुन ते लग्न मोडण्यास भाग पाडले. पुन्हा पीडितेशी जवळीक साधत व पुन्हा लग्नाचे अमिष दखवत वारंवार शारीरीक संबंध ठेऊन पुन्हा फिर्यादी तरुणीला गरोदर केले. लग्न करण्यास नकार दिला. गर्भ खाली करण्यास जबरदस्ती करुन गर्भ खाली नाही केला तर, तुला ट्रेन खाली टाकीन, नाहीतर तुझे चोवीस तुकडे करीन असे म्हणत धमकावले.
ही घटना (दि. १/८/२०२१ पासुन दि. ८/१२/२०२२) रोजी पर्यंत शिवार चौक, रहाटणी येथील लॉजवर घडली. १९ वर्षीय पीडित महिलेने आरोपी मिलींद वाघमारे ऊर्फ लखन (रा. ज्ञानदिप कॉलनी, दगडु पाटीलनगर, थेरगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.