न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि. १०) झालेल्या शाईफेकीनंतर रविवारी (दि. ११) पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संलग्न करण्यात आले. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले.
पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांना विशेष शाखा एक येथे संलग्न केले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचा प्रभार पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्याकडे दिला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांना चिंचवड पोलिस ठाण्यात संलग्न केले आहे. चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना पिंपरी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. प्रशासकीय व बंदोबस्ताच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न केले असल्याचे आदेशात नमूद आहे.