- फसवणुकीचा नवा प्रकार; रहाटणीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- घरातील किराणा मालाचे साहित्य आणण्याकरिता फिर्यादी या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी इसम फिर्यादीजवळ आला. त्याच्या शेठला १२ वर्षांनंतर मुलगा झाला आहे, तुम्ही मराठी आहेत का? तुम्ही गरीब आहेत का? असे म्हणत फिर्यादी महिलेचा विश्वास संपादून त्यांना बेकरीच्या समोर नेले.
आरोपी व तिथे बसलेल्या त्याच्या जोडीदाराने ते कामगार असल्याचा भासवून त्यांचे शेठ हे गरीब लोकांना फुकट कपडे वाटत आहेत, अशी तोतयेगीरी केली. फिर्यादीला त्यांच्या गळ्यात असलेली २५,००० रु किंमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, २५,००० रू किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याच्या मन्याची माळ काढुन, पायातील चप्पल काढुन पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी फिर्यादीच्या नकळत पिशवीतील फिर्यादीचे दागिने आणि ७,००० रु रोख रक्कम घेवुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १८) रोजी दुपारी १२.४५ वा. चे सुमारास छत्रपती चौक व क्राऊन बेकरीसमोर, रहाटणी येथे घडली. ७० वर्षीय वृद्ध महिलेने दोन अनोळखी इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















