न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- सोन्याचे दागिणे बनवुन देणाऱ्या कारागीर आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या राहत्या घरी येवुन फिर्यादीकडुन सोन्याची बिस्कीटे घेतली, त्याचे दागिणे बनवुन देतो, असे सांगत सोन्याचे दागिणे बनवुन दिले नाही. राहते घर सोडुन, मोबाईल स्विच ऑफ करुन स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी फिर्यादीचे ९१.१५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याची अंदाजे १६,६४,८८३ रुपयांची फसवणुक केली.
ही घटना (दि. ७/११/२०२२ रोजी ते आजपर्यंत), फ्लॅट नं. १३, श्री गणेश अपार्टमेंट, स.नं. ११३/१०/१३, नढेनगर, काळेवाडी येथे घडली.
फिर्यादी किसन रेवजी तांबे (वय ५१ वर्षे, रा. फ्लॅट नं. १३, श्री गणेश अपार्टमेंट, स.नं. ११३/१०/१३, नढेनगर, काळेवाडी) यांनी आरोपी सॅम्युअल हरजोली हक (दिपु शेख), रॉनी ताजोद्दीन शेख, (सध्या रा. नढेनगर, काळेवाडी, मुळ रा. नमाजग्राम रोड, फ्लॅट नं. ०१. ग्राऊंड फ्लोअर, ताजोद्दीन बिल्डींग, थाना पांडवा, जि. हुगळी पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















