न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- संत गाडगेबाबा हे भजन कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी कायम आग्रहशील असणारे कृतीशील थोर समाजसुधारक होते, असे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अय्यंगार, अविनाश ढमाले, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, गजानन गवळी, आण्णा कुदळे, विशाल जाधव, सुनील अभंग, संजय दळवी, संतोष जोगदंड, ॲड.प्रविण जगताप, विलास वाघ, अरुण लोंढे,रवी म्हस्के, कुंडलिक मोहिते, सोमनाथ शेळके, संतोष गोतावळे, राजेश चव्हाण, नवनाथ वाघ, प्रशांत दळवी, किरण लोंढे, कुमार दळवी, सुनिल पवार, सतीश राऊत, राजाभाऊ दळवी, संतोष भालेकर, अरुण तळेकर, प्रमोद निकम, रामेश्वर गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सुमन अभंग, वंदना जाधव, वैशाली राऊत, कल्पना गायकवाड आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, संत गाडगेबाबा यांनी अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी, समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. दीनदुबळे, अनाथ तसेच दिव्यांगांची सेवा देखील त्यांनी केली. साधे राहणीमान असलेल्या गाडगेबाबांनी जनजागृतीसाठी आणि शिक्षण प्रचार प्रसारासाठी महान कार्य केले, असे सांगून संत गाडगेबाबांचा समाजसेवेचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असेही जगताप म्हणाले.
















