न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- सोसायटीमध्ये मैत्रीणीच्या डॉगसोबत फिर्यादी वॉकिंग करीत होत्या. त्यावेळी आरोपीनी फिर्यादीस जवळ बोलावले. डॉगबाबत विचारणा करण्याच्या निमित्त्ताने फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करीत फिर्यादीचा विनयभंग केला.
त्यावेळी फिर्यादी तिथून घाबरून निघुन जात असताना आरोपीने फिर्यादीचा वारंवार पाठलाग करीत त्यांचा मोबाईल नंबर मागुन फिर्यादीची छेड काढली. ही घटना (दि. १९) रोजी रात्री १२.०५ वा. च्या सुमारास बिल्डींग नं.७, समोर एक्झार्बिया सोसायटी, हिंजवडी येथे घडली.
२९ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी संभाजी दत्तू पोळ (वय ४५ वर्षे, रा. प्लॅट नं. १०६, बि.ऐ १२. एक्झार्बिया सोसायटी, हिंजवडी, मुळगाव मु.पो.मोहोळ, जि.सोलापुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















