न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- प्रायव्हेट फायनान्सचा फिर्यादीचा व्यवसाय आहे. आरोपी यांनी संगणमताने फिर्यादीकडून (दि. १८/०९/ २०२०) रोजी ३०,००,००० रूपये कर्ज घेतले. त्यापैकी २२,००,००० रूपये मुद्दल रक्कम व त्यावरील मासिक ३३,००० रूपये व्याज असे (दि. २८/०७/२०२२) पासुन आरोपींनी फिर्यादी यांना परत दिले नाहीत. फिर्यादींनी वेळोवेळी पैसे मागितले असता त्यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत फिर्यादीचे घेतलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २८/०७/२०२२ पासुन ते दि.१९/१२/२०२२) रोजी सायं ६.०० वा. पर्यंत प्लॉट नं. १५, सेक्टर २७, प्राधीकरण, निगडी येथे घडला.
फिर्यादी प्रशांत हिम्मतराव देशमुख (वय ५४ वर्षे, रा. कामधेनु आर्चिड, प्लॉट नं. ०४, ए-१, पुर्णानगर, चिंचवड) यांनी आरोपी महीला आरोपी (वय ३२ वर्षे), बासु निर्मल अधिकारी (वय ३९ वर्षे, दोन्ही रा. ग्रीनपार्क, ए ३. कामगारनगर, खराळवाडी पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















