न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- पैसे व गावाकडील शेतजमीन आमच्या नावावर करा; नाहीतर आम्ही तुम्हाला संपवितो, अशी धमकी आरोपींनी फिर्यादीला दिली. फिर्यादीच्या आरोपी मुलाने व त्यांच्या आरोपी पत्नीने फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.
आरोपी मुलाने पडदयाला वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या पाईपने व चाकुने मारहाण करुन डोक्याला व शरिरावर गंभीर स्वरुपाची दुखापत केली. फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीच्या अवघड जागी मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०) रोजी सकाळी ११.०० वा.चे सुमारास राहत्या घरी, फ्लॅट नं.ई/१२०३, सोनिक्स टॉवर, वाकड येथे घडली. फिर्यादी मधुकर लक्ष्मण इंगोले (वय ६० वर्षे, रा. सध्या फ्लॅट नं. ई/१२०३, सोनिक्स टॉवर, वाकड) यांनी आरोपी मुलगा सचिन मधुकर इंगोले (वय ३५ वर्षे), महीला आरोपी (वय ५५ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















