न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- प्रायोगिक तत्वावर टपाल विभागाने चिंचवड विभागाला एकून सात ई- बाइक पोस्टमनसाठी दिल्या आहेत. पोस्टाच्या पिंपरी- चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी या दुचाकी वापरण्यात येत आहेत.
शहरात ३३ टपाल कार्यालये आहेत. पोस्टमन शहरात फिरण्यासाठी सायकल वापरतात. तर काही पोस्टमन आजही आसपासच्या भागात चालत पत्र पोहचवितात.
पोस्टाच्या पिंपरी- चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी सात ई – बाइक मिळाल्या आहेत. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी आदी परिसरात पोस्टमन टपाल वाटपासाठी जाताना या वाहनांचा वापर करतात. काम संपले की, ही वाहने सायंकाळी जमा केली जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती घेऊन जातात. त्यामुळे नागरिकांना वेळेवर टपाल मिळत आहे. तसेच आर्थिक बचतही होत आहे. – के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, चिंचवड…
















