न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- वेगवेगळ्या कंपनीचे व मॉडेलचे मोबाईल फोन फ्लिपकार्ट कंपनीतील ब्रँचमधुन फिर्यादीकडील डिलीव्हरी बॉय यांनी कंपनीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहेत. त्याची किंमत ४,१२,६८६ रुपये एवढी आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०२२ अखेर ते नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत फ्लिपकार्ट कंपनी, मारूंजी येथील बॅचमध्ये घडली.
फिर्यादी राजेश ओमेनकुट्टन (वय ३४ वर्षे, रा. आयोध्या निवास, ६/२९ जयमाला नगर, लेननं. २, ओल्ड सांगवी) यांनी आरोपी सचिन संजय मोरे (वय ३० वर्ष रा. ए ३, फलॅट नं ६१३, एक्झर्बाया सोसा, नेरे दत्तवाडी), राजू बिरेंद्रकुमार गुप्ता (वय ४६ वर्ष रा. रमेश भोयर याचे रूममध्ये भोईरवाडी फेज ३), म्यानदेव विजयकुमार ढवळे (वय २१ वर्ष, रा. रत्नदिप कॉलनी, संभाजी यांचे रूममध्ये डांगे चोक वाकड), केशव वर्मा (वय २४ वर्ष, रा. एस के कुमार यांची रूम विप्रो सर्कल फेज २ हिंजवडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


















