न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- रस्त्याने पायी चालत असताना तीन अनोळखी इसमांपैकी एकाने फिर्यादी विद्यार्थ्याला लोखंडी सु-याचा धाक दाखवला. फिर्यादीकडील रु १०,००० रू किंमतीचा पोको कंपनीचा मोबाईल, एक हजाराची चांदीची चैन, दोनशे रुपयांची चांदीची अंगठी व रोख रुपये एक हजार असे एकुण १२,२०० रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेला.
ही घटना (दि. २२) रोजी सकाळी ५.४५ वा चे सुमारास बॅडमिटन कोर्ट हॉल, संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी हर्ष आनंद (वय २१ वर्ष, रा. त्रिमुर्ती बिल्डींग, राजराजेश्वरी, गर्ल होस्टलचे समोर, पुणे, मुळगांव – सुषमा सदन केदारनाथ रोड, साहु पोखर, बिहार) यांनी आरोपी अॅक्टीवा गाडी (एम.एच १४ सी.झेड ००६९) यावरील तीन अनोळखी इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















