- जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपी अद्यापही मोकाटच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- मित्राबरोबर फिर्यादी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात व संपुर्ण शरीरावर पालघन आणि तलवारीसारख्या लोखंडी पट्टीने वार करून त्याचा खुन केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सुरज उर्फ सोन्या संदिप शिंदे (वय २२ वर्षे) असे हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना (दि. २३) रोजी सायं. ६.४५ वा चे सुमारास बैलगाडा शर्यत घाट, महादेवाच्या मंदिराजवळ, जाधववाडी, चिखली येथे घडली.
फिर्यादी किशोर दत्तात्रय सोनवणे (वय १८ वर्ष, रा. संतोष जांभुळकर यांचेकडे भाडेकरू, जांभुळकर कमानीजवळ, जाधववाडी, चिखली) याने आरोपी आदित्य पोटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, लालु यादव (रा. चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















