न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- मोबाईल क्रमांक ९४५६६८३७७३ वर फिर्यादीचे मित्र अनिल जैन यांचा फोटो वापरुन आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. फिर्यादी यांना त्यांचा मित्र अनिल जैन आहे, असे भासवुन त्यांच्याकडे फिर्यादीला अर्जंटमध्ये दिल्ली येथे ३ लाख रुपयांची आवश्यकता आहे, असे सांगितले.
त्या बदल्यात सह आरोपी हा पुणे येथे कॅश आणुन देईल, असे सांगितले. फिर्यादी यांचा दिल्ली येथील मित्र शक्ती भाई यांच्याकडुन तिसरा आरोपी दिपक मो. नं ८४४८५६२०५४ याने रक्कम घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली.
ही घटना (दि. २३) रोजी दुपारी १.५५ वा चे सुमारास जैन हाऊस, कार्तिक हॉस्पिटलजवळ, चिंचवड येथील फिर्यादीच्या रहात्या घरी घडली. फिर्यादी राजेंद्र सुरेश जैन (वय ५६ वर्षे, चिंचवड) यांनी आरोपी अनिल जैन मो.क्र ९४५६६८३७७३, संदिप जैन मो.क्र ९४२९८६३३५३, दिपक मो. नं ८४४८५६२०५४ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















