न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२२) :- हॉटेलमध्ये जेवण करुन फिर्यादी महिंद्रा स्कारपियो गाडी (एम.एच.११/वाय ५३७५) स्वतः चालवित जात होते. कंपनीच्या समोरुन टर्न घेत असताना अज्ञाताने सिटी वाजविली. कंपनीच्या वॉचमनने सिटी वाजवली असेल, असे फिर्यादीला वाटले. फिर्यादीने त्यांची गाडी रोडच्या कडेला लावुन कंपनीसमोर आले असता दोन अनोळखी इसमाने फिर्यादी व फिर्यादीचा मित्र प्रभाकर अण्णप्पा कोरे यास धक्काबुक्की केली.
फिर्यादी यांच्या उजवे हाताच्या बोटातील २०,००० रुपयांची अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी व ३५०० रु. रोख रक्कम जबरदस्तीने शर्टाच्या खिशातुन हिसकावुन चोरुन नेत आरोपी मारुती काळया रंगाच्या स्विफ्ट कारमधून भोसरीच्या दिशेने निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४) रोजी रात्री ११.४५ वा चे सुमा. जयश्री पॉलिमर्स प्रा लि कंपनीच्या बाजुला, थरमेक्स चौकाच्या पुढे घडली. फिर्यादी रामदास कुंडलिक ताटे (वय ५१ वर्षे, रा. से नं २२, माता रमाई हौसिंग सोसायटी बिल्डींग, नं २२, रुम नं ३०९, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी आरोपी दोन अनोळखी इसम (वय अं. २७ ते २८ वयोगटातील) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















