न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- तुळजापूर, अक्कलकोट देवदर्शन करण्यासाठी परिवारासह फिर्यादी गेले होते. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने राहत्या घराचा दरवाजा खालच्या बाजुने कशाचे तरी सहाय्याने तोडून त्यावाटे घरात प्रवेश केला.
घरातील ४,२५,००० रु. ची रोख रक्कम चोरी करुन नेली आहे. ही घटना (दि. २६) रोजी रात्री ८.३० वा. चे सुमारास १३०, मेन बाझार, देहूरोड येथे घडली.
फिर्यादी ज्ञानेश्वर वसंत पवार (वय ६५ वर्षे, रा. देहूरोड) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















