न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- पत्निसोबत राहत नाही याचा राग मनात धरुन सह आरोपींसह फिर्यादीच्या पत्निने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. सर्वांनी फिर्यादीला ओढत बाहेर नेले व खाली पाडुन लाथबुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपीने तेथे पडलेल्या रॉडने फिर्यादीच्या पायावर मारुन जखमी केले. सह आरोपी यांनी दगड व विटांनी मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २७) रोजी रात्री १०.३० वा. सुमारास द्वारका स्क्वेअर बिल्डींग शेजारी, देवीदास तापकिर यांच्या घराचे बाहेर, च-होली फाटा, च-होली बु.. येथे घडली.
फिर्यादी चंद्रकांत पांडुरंग काळे (वय २८ वर्षे, रा. च-होली फाटा, च-होली, मुळगाव खटकेश्वरनगर लोनार, ता लोनार, जि. बुलढाणा) यांनी आरोपी महिला आरोपी, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















