न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- विनापरवाना बेकायदेशीररित्या अनाधिकारने पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आरोपीने देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१,००० किमतीचा ऐवज जप्त केला.
चाकण म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई (दि. २८) रोजी १०.३० वा.चे सुमारास म्हाळुंगे गावच्या कमानीजवळ ता. खेड येथे घडला. देवेंद्र सुनिल मिंडे (वय ३४ वर्षे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.















