- सरकारी कामात अडथळा; आठ लोकांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- मोईतील जमिन गट नं. ४८९ या जमिन गटाची अती तातडीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला होता. अर्जदार यांना (दि. २७) रोजीची तारीख देण्यात आली होती. फिर्यादी हे मोई ता. खेड येथिल जमिन गट नं. ४८९ मध्ये मोजणी प्रकीया पुर्ण करण्यासाठी गेले असता, मोजणी अर्जदार व त्यांच्या बरोबरचे लोक, तसेच संबंधित गटातील लोक आले होते. त्यावेळी पोलीस बंदोबस्त होता.
फिर्यादी यांनी मोजणी प्रकीया सुरु करुन इटीएस मशिनव्दारे मोजणी करीत असताना जमिन गट नं. ४८९ मधिल जमिनक्षेत्र धारक आरोपी नं १ ते ३ त्यांनी मोजणीच्या वेळी हरकत घेवुन मोजणी करण्यास मज्जाव केला. आरोपींनी फिर्यादीला ‘ तुम्ही या ठिकाणी मोजणी करावयाची नाही, मोजणी केली तर मारामारी करु, किंवा भांडणे होतील ‘ असे म्हणत मोजणीस अडथळा केला. त्यातील एकाने हातात दगड घेतल्याने फिर्यादी यांना मोजणी थांबवावी लागली. आरोपीच्या कृत्यामुळे फिर्यादीस शासकीय काम करताना अडथळा निर्माण झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २७) रोजी सकाळी ११.३० वाजता घडला. फिर्यादी अमोल सुरेश चौधरी (वय ३८ वर्ष, सरकारी नोकरी, (परीरक्षण भुमापक/ निमतानदार), रा. हडपसर, फलॅट नं. ए/७०३ कृष्णा ब्लेसिंग, हडपसर) यांनी आरोपी गुलाब दशरथ करपे, सचिन तुकाराम गवारी, त्यांच्या बरोबर इतर ५ ते ६ लोक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















