- रक्कम न भरल्यास पात्रता यादीतून नाव कायमस्वरूपी रद्द होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या चिखलीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेतील १ हजार लाभार्थ्यांना स्वहिस्सा ३ लाख ७६ हजार रूपये भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची मुदत आहे.
मुदतीत स्वहिस्सा न भरल्यास पात्रता यादीतून नाव कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
या योजनेमध्ये २३ ऑगस्ट २०२२ ला संगणकीय सोडत काढून प्रतिक्षा यादीतील १ हजार लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार चिंचवड गाव येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात व पालिकेच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी. त्यास विलंब झाल्यास यादीतून नाव कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.















