न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांकडून पार्टी करून वाहन चालविले जाते. यात मद्यपी वाहनचालकांमुळे अपघाताचे प्रकार होतात. तसेच अनेकांकडून धिंगाणा घातला जातो. असे वाहनचालक तसेच गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच आहे. त्यासाठी शहरात तीन दिवस रस्त्यावर अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यात गुरुवारी (दि. २९) रात्री कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी करण्यात आली. यात मोठी कारवाई करून पोलिसांनी बेशिस्त व मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली.
नववर्ष स्वागत करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. स्ट्रीट क्राइम तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस सरसावले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या मार्गावर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी केली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून काही वाहनचालकांनी यू-टर्न घेत पळ काढल्याचे प्रकार घडले. तसेच ट्रिपल आलेल्या अनेक वाहन चालकांवर पोलिसांनी ई-च लनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली.
मद्यपी वाहनचालकांच्या तपासणीसाठी अनलायझरचा वापर होतो. मात्र, कोरोना संसर्गामुळे ब्रेथ अॅनलायझर वापरात नाही. पोलिसांना संशय आल्यास संबंधित वाहनचालकाला रस्त्यावर चालायला सांगण्यात येते. मद्यपान केल्याचे त्यातून दिसून आल्यास संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई होत आहे. या कारवाईत ६६ तर ६२ जणांवर पिपरी येथे बेशिस्त वाहन- चालकांवर कारवाई करून गुलाबाचे फूल देत पोलिसांनी गांधीगिरी केली. तसेच काही ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना पोलिसानी लाठीचा प्रसाद दिला. इतर वाहन- चालकांनी याचा धसका घेतला. भरधाव वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली.
स्वागत करताना रस्ते अपघात होऊन प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर गोंधळ करू नये अथवा अवैध पार्टी करू नये, असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त…


















