न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात रविवारी (दि. १ जानेवारी २०२३) रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. हे शिबीर डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटर, ७ वा मजला हायटेक बिल्डिंग, डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी पुणे येथे होत आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ०२० ६७११६४४१ / ७६२०५९८८६७ वर संवाद साधू शकता.
वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


















