न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- लोणावळा येथे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा जुना खंडाळा येथील बंगल्यातील खासगी जलतरण तलावामध्ये बुडाल्याने मृत्यू झाला. निखिल संपत निकम (वय-२२, रा. चिंचवड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल व त्याचे काही मित्र लोणावळ्यात आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. पार्टी सुरू असताना निखिल पाण्यात उतरला होता.
या दरम्यान तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे लोणावळ्यातील खासगी बंगल्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















