न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- नगरसेविका ममता गायकवाड यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २६ मधील कावेरीनगर वाकड येथील २५ लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व कावेरी सबवे ते शौय हॉटेल, काळेवाडीफाटा ते छत्रपती चौक, छत्रपती चौक ते माऊली चौक, व हॉटेल वाघजाई ते कल्पतरु चौक या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
आज गुरुवार (दि. ७) रोजी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चोंधे, नगरसदस्य संदिप कस्पटे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रमोद यादव, अधिक्षक अभियंता अनिल सुर्यवंशी कार्यकारी अभियंता रामदास तांबे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कलाटे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
कावेरी चौक सबवे ते पिंक सिटी कॉर्नेरपर्यंत डी.पी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे व विशालनगर, वाघजाई हॉटेल ते कस्पटे चौक पर्यंत सिमेंट कॉक्रींटचा रस्त्यासाठी सुमारे १२ कोटी खर्च येणार आहे. फेब्रुवारी २०२१ अखेर काम पूर्ण होणार असून नागरीकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच पाण्याच्या टाकीमुळे पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.











