न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- मुलगी जन्मास आली, तेव्हापासुन मुलगी का जन्मास आली. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि छोटया-छोटया कारणांवरुन फिर्यादीस त्यांचे पती, सासु, सासरा, नणंद यांनी वाईट शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांचा वेळोवेळी मानसिक व शारिरीक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०१५ पासुन ११/०१/२०२३ पर्यंत फिर्यादीच्या सासरी, विठ्ठलनगर, दोस्ती बेकरी जवळ, नेहरूनगर, पिंपरी येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी कृष्णा राजेंद्र चटोले (वय ३५ वर्षे), राजेंद्र चटोले (वय ६९ वर्षे), महिला आरोपी (वय ६५ वर्षे अंदाजे), महिला आरोपी (सर्व रा. नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















