न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर महील फिर्यादी या नोकरीस आहेत. फिर्यादी त्यांच्या सहकारी अधिकारी व इतर स्टाफसह अतिक्रमण निर्मुलणाचे काम करीत होत्या. त्या दरम्यान आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या सहकारी अधिका-यांच्या तोंडावर हाताबुक्यांनी मारुन जखमी केले.
जप्त करीत असलेले सामान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी एका जवानाला धक्काबुक्की करुन इतर जवानांना ढकलाढकली केली. त्याचवेळी महिला आरोपी फिर्यादीशी हुज्जत घालुन इतर दोन आरोपींशी संगणमत करुन फिर्यादी व त्यांच्या सहका-यांना मोठमोठ्याने शिवीगाळी केली.
तसेच फिर्यादीने कारवाई करु नये यासाठी इतर दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगुन फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १२) दुपारी १२.३० ते १.०० वा. सुमारास, कपडा मार्केट, शगुन चौक, पिंपरी येथे घडला. पिंपरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















