- शहरातील विविध भागात धर-पकड, लॉज हॉटेलवर छापे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. २१) रोजी पहाटे ००.०१ ते ५.०० वा. पर्यंत कोम्बींग व नाकाबंदी दरम्यान ” ऑल आऊट ऑपरेशन ” च्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान नाकाबंदीत १७९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरिल व हिस्ट्रीशिटर ४११ आरोपी तपासले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे १८५ वाहनांवर कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे. १४४ संशयीत इसम चेक करण्यात आले आहेत. १३७ हॉटेल, लॉज चेकींग करण्यात आले आहेत. पाहिजे आरोपी २९ चेक केले त्यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह २२ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महा. पोलीस अधि कलम ३३ डब्ल्यु प्रमाणे शर्तींपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालकावर २१ खटले भरण्यात आले आहेत. २१ तडीपार आरोपी चेक करण्यात आले आहेत. बी.पी. अॅक्ट कलम १२२ प्रमाणे १३ कारवाई, आर्म अॅक्ट प्रमाणे ८ लोखंडी कोयते, २ तलवार, २ सुरे असे एकुण १२ हत्यारे जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारुबंदी कायदयाप्रमाणे ७ कारवाई करण्यात आली आहे. बी. डब्ल्यु वॉरन्ट ७ बजावणी करण्यात आली आहेत. पकड वॉरन्ट ६ बजावणी करण्यात आली आहे. संशयीत वाहने ६ ताब्यात घेण्यात आली आहेत. सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे ५ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. फरारी आरोपी चेक ५, सीआरपीसी कलम ११० प्रमाणे ३ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोक्का केसमधील २ आरोपी चेक केलेले आहेत. बी.पी. अॅक्ट कलम १४२ प्रमाणे ०१ तडीपार आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. बी.पी. अॅक्ट कलम १२४ प्रमाणे १ कारवाई करण्यात आली आहे. एनडीपीएस अॅक्टप्रमाणे १ कारवाई कारवाई करण्यात आली आहे. एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे १ कारवाई (वाकड पोलीस स्टेशन हद्दीत ८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा) या प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सहपोलीस आयुक्त मनोज लोहीया,अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त परि. १. विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त परि २ काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त तसेच सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी व अमलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार अशी एकुण ६६ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस अंमलदार कारवाईत सहभागी झाले होते.