न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- ऑनलाईन माध्यमातून कपड्याच्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक केल्यास घरबसल्या पैसे मिळतील, असे फिर्यादीला आरोपींनी आमिष दाखवले. फिर्यादीकडून एक लाख ७७ हजार दोनशे रुपये ऑनलाईनद्वारे घेत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
ही घटना सांगवीत घडली. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी लेटिशा, रिया ग्लोबल, ग्लोबल चॅट प्लॅटफॉर्म कंपनी आणि बँकधारक व कंपन्या यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.