न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील ॐ साई रिक्षा स्टँड व सकल मराठा परिवार यांच्या तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याप्रसंगी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष गणेश नानेकर, उपाध्यक्ष महेश जाधव, इंद्रजीत जाधव, चंद्रकांत मोरे, आत्माराम गायकवाड, लालासाहेब कांबळे, सुधीर बारवकर, सुनील गोफने, कृष्णा गरड, किशोर पुंडे, सुहास क्षीरसागर, निवृत्ती करचे, बजरंग गवारे आदी उपस्थित होते.
यावेळी रक्तदानाचे महत्त्व सांगताना संजय भिसे म्हणाले की, ” रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर दुसऱ्याला रक्तदानाचा फायदा होतच, त्याचे पुण्य आपल्याला मिळते. मात्र, स्वतःलाही रक्तदानाचा फायदा होतो. नियमित रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका ३०-४०% ने कमी होतो. असे डॉक्टर सांगतात. “