न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- कासारवाडीतील जय गणेश टायर या भंगार टायरच्या दुकानाला मंगळवारी (दि. ३१) रोजी पहाटे दोनच्या दरम्यान मोठी आग लागली होती.
महापालिकेच्या दहा बंबांसह पीएमआरडीए, पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व टाटा मोटर्स कंपनीचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानासह साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच शेजारीच असलेल्या एका रुग्णालयापर्यंत या आगीच्या ज्वाळा पसरल्याने रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील लाकडाच्या वखारीपर्यंत आग पोहोचली होती. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.












