न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- काळभोरनगर येथील क्रोमा ईलेक्ट्रीक रिटेल कंपनी या दुकानातून आरोपी यांनी संगनमत करून सॅमसंग कंपनीचे १,७७,९९९ किंमतीचे गॅलक्सी फोल्ड ४-१२ जीबी मोबाईल फोन चोरुन नेले आहेत.
ही घटना (दि. ३०) रोजी सकाळी ११.२९ ते ११.३६ च्या सुमारास घडली.
फिर्यादी सदानंद सुभाष सावंत (वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, रा. बी ७०४, स्वप्नसिल्प सोसायटी, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भा.द.वि. कलम ३८०, ३४ अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.












